Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : प्रत्येक तालुक्यात एक किंवा दोन मोठी रुग्णालय, वसतिगृह शोधून कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटर तयार आहेत. त्यातील सुविधा अद्ययावत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महसूलचे उप जिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, भूसंपादन अधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.
Share Now