उद्याची गोकुळ दूध संघाची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क

 कोल्हापूर : गोकुळची 61 वी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गतवर्षी सभेच्या सुरूवातीपासून विरोधक गटाने आक्रमक भूमिका घेतला होती. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्या घोषणेने संपूर्ण सभागृह दणाणले होते.
सभेच्या ठिकाणी घोषणाबाजी केल्याने संपूर्ण वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
गोकुळच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांनी स्टेजवर जाण्यास नकार दिल्याने वातावरण खूपच गोंधळाचे बनले होते. 

उद्याचे गोकुळ 61 वी सर्वसाधारण सभा वादळी होणार याची दाट शक्यता
विरोधी गटाच्या विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळ दूध संघाची लेखापरीक्षणची केलेली मागणी सत्ताधारी गट लेखापरीक्षणाला स्थगिती होण्यासाठी हायकोर्टात घेतलेली धाव त्याला काही दिवसापूर्वीच कोर्टाने फेटाळलेला अर्ज दोन्ही गटाकडून पत्रकार परिषद घेऊन एकमेकावर केलेलाा आरोप प्रतिआरोप पाहता उद्याची सर्वसाधारण सभा वादळी नक्की ठरणार..
सभेच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची शक्यता सभेच्या संयोजकांनी खबरदारी म्हणून पोलीस चौकशी व ओळखपत्र असल्याशिवाय सभेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, अशी सर्वांना सूचना देण्यात आलेचे सांगण्यात येते.
गतवर्षी सर्वसाधारण सभा महासैनिक दरबार हॉल येथे होता यावेळीचे ठिकाण बदलला आहे.
उद्याच्या गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभेला वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, व विद्यमान संचालिका शौमिका महाडिक प्रमुख उपस्थितीत असणार आहे या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *