Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
कोल्हापूर, दि.१४: शिवसेना- शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, मंडलिक गटाचे प्रमुख नेते व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे प्रा. संजय मंडलिक यांना ऐन खासदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत आणत आहेत कि काय? अशा शंका उत्पन्न होणाऱ्या घटना घडत आहेत, असे प्रत्युत्तर गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी दिले आहे.
कारण कालच एका रस्त्याच्या कामाचा मुद्दा काढून त्यांनी जे नाट्य केले. वास्तविक; असं करण्याची गरजच नव्हती. कारण; हे काम खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या पत्रावरून आहे की नामदार हसन मुश्रीफ यांच्या पत्रावरून आहे यावरून ते अनेक दिवस थांबलेले आहे. दरम्यान; कडगाव – बेकनाळ- बाळेघोल रस्त्यावरील पुलाचे ते काम नामदार हसन मुश्रीफ यांच्या मागणीनुसारच मंजूर झालेले आहे. राजेखान जमादार यांनी नामदार हसन मुश्रीफ यांना जरी विचारले असते किंवा आमच्याशी जरी चर्चा केली असती तरी ही कृत्य त्यांना टाळता आलं असतं.
पत्रकात पुढे म्हटले आहे, राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास मंत्री पद हे खातं होतं, त्यावेळी खासदारांना निधी देण्याचे कोणतेही धोरण महाविकास आघाडीमध्ये ठरलेलं नव्हतं. तरीसुद्धा नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मोठ्या मनाने खासदार, मंडलिकसाहेब यांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी कोट्यावधीचा स्वतःचा निधी दिलेला आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघातील नगरपालिकानाही निधी दिला. त्याबद्दल खासदार मंडलिकसाहेब यांनी नामदार मुश्रीफ यांचे अनेक जाहीर कार्यक्रमातून आभारही मानलेले आहेत. एवढा निधी दिलेला असतानाही अवघ्या दीड कोटीच्या रस्त्याच्या कामासाठी राजेखान जमादार एवढे अकांडतांडव आणि आक्रस्ताळेपणा कशासाठी करीत आहेत?
मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये कडगांव- बेकनाळ- बाळेघोल या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५४ वर हणबरवाडी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम हे काम नामदार हसन मुश्रीफ यांच्या मागणीनुसार मंजूर आहे. त्याचा हा घ्या बजेट बुकचाच पुरावा
यापूर्वी जमादार हे मुरगुड नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना त्यांच्याच गटातील नगरसेवकांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन रस्त्याच्या कंत्राटावरून फ्रीस्टाइल केलेली अनेक उदाहरणे आणि वर्तमानपत्रांमधून वाचलेली आहेत. तसेच; स्वतःचा गट निर्माण करून सातत्याने खासदार संजय मंडलिक यांच्यावरती दबाव वाढवत आहेत.
वास्तविक; ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही वेळ सामंजस्याने वागण्याची आहे. एवढ्याशा साध्या गोष्टीसाठी त्यांनी केलेल्या आकांडतांडव आणि आक्रस्ताळेपणाबद्दल खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. नामदार हसन मुश्रीफ यांनी हजारो कोटींचा निधी दिलेला आहे. त्यामुळे कंत्राटदारांबद्दलची त्यांची भूमिका सर्वांनाच माहीतही आहे. एखादे काम का प्रलंबित आहे, याची माहिती नामदार हसन मुश्रीफ किंवा आम्हाला जरी त्यांनी सांगितले असते, तरीही हा प्रश्न निकालात निघाला असता.
असे गोकुळचे संचालक युवराज पाटील व केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांचे प्रत्युत्तर