पोलीस असल्याची बतावणी करून अनेक गुन्हे केलेची उघडकीस…आरोपी जेरबंद.

विशेष वृत्त: जावेद देवडी

 

कोल्हापुर,/ पोलीस असल्याची बतावणी करुन व जबरी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करून 18 गुन्हे उघड ” 328 ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह इतर साहित्य असा एकूण 23,78,570 /- रु. किं.चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगीरी कौतुकास्पद असल्याची मत पत्रकार परिषदेवेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केली.

भाऊसाहेब दिनकर जगदाळे, (कागल) हे देवदर्शन करुन त्यांचे घरी जात असताना अचानक त्यांचे पाठीमागून दोन मोटर सायकलवरून चार अनोळखी इसमांनी येवून फिर्यादी यांना अडवून मारहाण करून त्यांचे गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी व खिशातील 5,500/- रूपये रोख रक्कम जबरदस्तीने काढुन चोरुन घेवुन मोटरसायकल वरुन निघुन गेले

या बाबत कागल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. त्याच दिवशी हुपरी पोलीस ठाणेत देखील एका वयस्कर इसमास मोटर सायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी आडवून पोलीस असलेची बतावणी करून जबरदस्तीने अंगठी काढून घेवून गेले बाबत हुपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाली.

एकाच दिवशी वयस्कर इसमांसोबत पोलीस बतावणी व जबरी चोरीचे दोन गुन्हे घडलेने मा. पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी सदरची बाब गांभिर्याचे असून सदर घडले दोन्ही गुन्ह्यांसह कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी घडले व उघडकीस न आलेले गुण्याच्या अनुषंगाने जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे यांना सुचना दिल्या होत्या.

वरीष्ठांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात घडले पोलीस बतावनी व जबरी चोरीचे गुन्ह्यांचे ठिकाणी भेटी देवून गुन्हा केलेची पध्दत व तांत्रिक दृष्ट्या तपास करून तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून गुन्हे उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव व शेष मोरे यांची पथके तयार केली..

सदर पथकांमार्फत तपास सुरू असताना दि.3/9/2023 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, महादेव वाघमोडे व शहर वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार, बाबासो कोळेकर यांना “कागल पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगार बागरअली अहंमदअली, (जिल्हा) बीड याने व त्याचे इतर तीन साथीदारांनी मिळून केला असून ते परत गुन्हा करणेकरीता त्यांचेकडील पल्सर व युनिकॉर्न मोटर सायकलवरुन तनवाणी हॉटेल समोरुन कोल्हापूर शहरात येणार आहेत अशी त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशिर माहिती मिळाली.

त्या माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक, संदिप जाधव व शेष मोरे तसेच त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, दिपक घोरपडे,

संजय हुंबे, वसंत पिंगळे, तुकाराम राजीगरे, रणजित कांबळे, संजय पडवळ, प्रितम मिठारी, सोमराज पाटील तसेच शहर वाहतुक शाखेचे बाबासो कोळेकर व गांधीनगर पोलीस ठाणे कडील रोहित ठोंबरे यांनी मिळाले माहितीनुसार तावडे हॉटेल परिसरातील तनवाणी हॉटेल येथे सापळा लावून 1 )बागरअली अहंमदअली, (जि.बीड, 

2 ) मुजाहिदअली मिस्कीलअली ( जि. बिदर,कर्नाटक) 3) गुलामअली फरिद्दीन इराणी, (जि. बिदर, कर्नाटक) यांना पकडले. त्यावेळी त्यांचा साथीदार 4) मुसौडीअली राजुअली, (जि. बीड ) हा पळून गेला. त्यानंतर तिघांची झडती घेतली असता त्यांचे कडील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व 1,52,690/- रुपये रोख रक्कम मिळून आली. सदर बाबत त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कागल पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

सदर तिन्ही आरोपींना कागल पोलीस यानी अटक करून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी पोलीस खात्याची बनावट ओळखपत्र तयार करून सदर गुन्ह्यांसह अशाच प्रकारे जबरी चोरीचे- 7, बनावट पोलीस असल्याचे 6, फसवणूकीचे 3 व मोटर सायकल चोरीचे 2 असे एकूण 18 गुन्हे केले असलेची कबुली दिली. त्यांचे चौकशीत मिळालेल्या दोन्ही मोटर सायकल चोरीच्या असलेची माहिती सांगितली. 

अटक आरोपींकडून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पोलीस ठाणे- 3, भुदरगड पोलीस ठाणे- 3, गडहिंग्लज पोलीस ठाणे 2, हातकणंगले पोलीस ठाणे 2, राधानगरी पोलीस ठाणे- 1, वडगांव पोलीस ठाणे- 1, जयसिंगपूर पोलीस ठाणे- 1, हुपरी पोलीस ठाणे 1, करवीर पोलीस ठाणे 1 व जुनाराजवाडा पोलीस ठाणे- 1 असे एकूण 16 गुन्हे, उघडकीस आले आहेत. आरोपींकडून 328 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 1,52, 190/- रूपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 23,78,570 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे मार्फत सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांचेविरुध्द महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात पोलीस असल्याचे खोटे सांगून,चेन स्नॅचिंग तसेच फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहेत. सदर टोळीकडुन कोल्हापूर सह इतर ठिकाणी गुन्हे केलेची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, दिपक घोरपडे, संजय हुंबे, वसंत पिंगळे, तुकाराम राजीगरे, रणजित कांबळे, संजय पडवळ, प्रितम मिठारी, चंदू नन्नवरे, संतोष पाटील, सोमराज पाटील, रफिक आवळकर, सुशिल पाटील, शहर वाहतुक शाखेकडील बाबासो कोळेकर व गांधीनगर पोलीस ठाणे कडील रोहीत ठोंबरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *