(अमर पवार:-रोहा प्रतिनिधी):-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या शिवशंभो युवासंघाची रोहा तालुक्यातील घोडदौड जोरात चालु असल्याच दिसुन येत आहे.रोहा तालुक्यातील गावोगावी या सामजिक संघाच्या शाखा निर्माण झाल्या असुन या शाखेच्या माध्यमातुन सामाजिक कार्याचा विडा उचलेली अनेक तरुण मंडळी आज शिवशंभो युवासंघाचे सभासद झालेले आहेत.जीवन जगत असताना आपण या समाजाचे देणे लागतो या जाणिवेतुन आज शिवशंभो युवा संघाचे पदाधिकारी काम करताना दिसत आहेत.तरुणाईच आवडत व्यक्तिमत्व असणारे सुशांत भोकटे या शिवशंभो युवासंघाचे संस्थापकिय अध्यक्ष असुन त्यांच्या सामाजिक कार्यशैलीवर विश्वास ठेवत असख्य तरुण या संघाचे घटक बनले आहेत.तसेच आज रोजी आर.आय.ए सभागृह एक्सेल रोहा येथे प्रमुख अतिथी म्हणुन मारुती भोकटे,महादेव भोकटे यांचई होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत जाधव यानी केले.या कार्यक्रमादरम्यान पदवीधर संघाची स्थापणा करीत अनेक तरुणांच्या नियुक्त्या करित त्यांच्यावर जबाबदार्या देण्यात आल्या.याप्रसंगी बोलताना “शिवशंभो युवासंघाचे संस्थापक” सुशांत भोकटे म्हणाले कि,शिवशंभो युवासंघाचा व्यासपीठ हा राजकिय व्यासपीठ नसुन तो एक सामाजिक व्यासपीठ आहे.युवासंघाने ठरवलेल्या चौकटीत राहुन काम करण्याचा आम्हि सर्वजण प्रयत्न करित आलेलो आहोत.नव्याने स्थापण झालेली कार्यकारणीदेखील तशाच पद्धतीने काम करिल. याप्रसंगी नव्याने नेमणुका झालेल्या पदाधिकार्याना शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवसंभो युवासंघ संचालित पदवीधर संघाची कार्यकारणी जाहिर झालेली असुन या पदवीधर संघाच्या अध्यक्षपदी सुशांत भोकटे,उपाध्यक्ष दिपक कांबळे,अरुण साळुखे,चिटणीस उमेश डोळकर, सह सचिव अविनाश शेळके,अमर पवार,रणदिप शर्मा,अक्षय कन्हेकर,दिपेश बांधल,विशाल कदम,महेश भगत,तेजस दळवी,गणेश पाटिल अादी पदाधिकार्यांची नेमणुक करण्यात आली.
तसेच या बैठकिच्या निमित्ताने शिवशंभो युवासंघ धाटाव विभाग कमिटीची स्थापण करुन अध्यक्षपदी संकेत खेरटकर,उपाध्यक्ष दिपक भोकटे,प्रमोद गायकवाड,राम महाडिक,यशवंत फाटक,पिंट्या भोकटे,प्रदिप मोरे,सुनिल थिटे,निलेश म्हसकर,संकेत भगत,छगन शिदे अादि पदाधिकार्यांची नियुक्ति करण्यात आली..