मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
सांगली प्रतिनिधी, विनोद पाटील, दक्षिण भारत जनसभेच्या जैन महिला परिषदेत तर्फे दि. 7 व 8 ऑक्टोबर 2023 ला कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक, सांगली येथे गोदा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
अशी माहिती जैन महिला परिषदेच्या सेक्रेटरी सौ. अनिता विनोद पाटील यांनी दिली.
महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व त्यांचा व्यवसाय वाढावा यासाठी जैन महिला परिषदेतर्फे दरवर्षी गोदा महोत्सव या प्रदर्शन व विक्री चे आयोजन करण्यात येते.
हे प्रदर्शन सर्व ग्राहकांना व विक्रेत्यांना जोडणारा दुवा आहे. यामध्ये खास दसरा दिवाळीसाठी विविध गृहपयोगी वस्तू,कपडे, ज्वेलरी, घरगुती तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्ताक्षर डेमो, लाईफ इन्शुरन्स, नर्सरी आणि सोबत खाऊ गल्लीही समाविष्ट आहे.
जैन महिला परिषद च्या अध्यक्षा सौ. स्वरूपा पाटील,यड्रावकर, उपाध्यक्षा सौ. अंजली कोले व सहसचिव सौ.गीतांजली उपाध्ये यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्या या सर्वांनी मिळून गोदा महोत्सवाचे नियोजन केले आहे.
तरी सर्वांनी गोदा महोत्सवास भेट देऊन आपल्याच माता भगिनींचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सौ. अनिता पाटील यांनी केले आहे.