कोल्हापूरचे पालकमंत्री तथा मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य ना. हसन मुश्रीफसो यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दि.8 रोजी महाआरोग्य शिबिर…..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 46 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

रविवारी धर्मदाय महा-आरोग्य शिबीराचे कोल्हापूर येथे आयोजन

कोल्हापूर, दि. धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर रिजन ट्रस्ट प्रॉक्टिशनर बार असोसिएशन व कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांचे संयुक्त विद्यमाने धर्मादाय संघटनेतर्फे रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी, ताराराणी विद्यापीठ व्ही.टी. पाटील हॉल, राजाराम रोड येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्व रोग निदान महा-आरोग्य शिबीराचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी दिली आहे.
या शिबीरामध्ये नेत्ररोग, दंतविकार, त्वचारोग, न्युरो, एचआयव्ही, ह्दयरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, कान नाक घसा, ऑर्थोपेडिक, किडनी, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक विभाग आदी सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. शिबीरामध्ये कोल्हपूर शहर आणि जिल्ह्यातील 18 हॉस्पिटल, सांगली 22 हॉस्पिटल, रत्नागिरी 5 हॉस्पिटल व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 3 हॉस्पिटल सहभागी होणार आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली येथील आणि सिंधुदूर्ग येथील सर्व धर्मादाय रुग्णालयांचे पथक शिबीरात आरोग्य तपासणी करणार आहेत.
शिबीराचा उद्देश हा कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली येथील आणि सिंधुदूर्ग येथील गरीब व दुर्बल घटकातील लोकांनी महागड्या उपचारांकरिता मुंबई, पुणे सारख्या शहरात दूर न जाता कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्येच विविध प्रकारच्या रुग्ण सेवा उपलब्ध करुन देणे हा आहे. तसेच सर्वसामान्य लोकांना कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालयांबद्दल व त्यांच्या रुग्णसेवेबद्दल एकाच छताखाली माहिती पुरविणे हा आहे.
या शिबीराची जय्यत तयारी सुरु असून ते मोफत आहे. या सर्व रोगनिदान महा-आरोग्य शिबीराचा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त विभागातर्फे श्रीमती पवार व  शिवराज नायकवडी यांनी केले आहे.

या महा आरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री तथा मंत्री वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य ना. हसन मुश्रीफ हे असणार आहेत. यावेळी धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन तसेच स्थानिक खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *