चांगुलपणाच्या चळवळीच्या रेट्याने हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्लाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

शिक्षक हेरंब कुलकर्णी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ते शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे जोशी क्लासेस जवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.

डोक्यावर जबर मार बसला असता ते रस्त्यावर पडले.
त्या नंतर त्यांनी अहमदनगर सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण पोलिसांची तपास संत गतीने हालचाली कोणालाही अटक केली नाही.
या घटनेची कुलकर्णी मॅडम यांनी चांगुलपणाच्या चळवळीच्या ग्रुप वर सदर वृत्तांत मांडले असता याची दखल माननीय ज्ञानेश्वर मुळे सरांनी व ग्रुप वरच्या मान्यवर यांनी घेत कुलकर्णी कुटुंबीयाला सहानुभूती देऊन अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख व मुख्यमंत्र्यापर्यंत फोन गेल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
अहमदनगर पोलीस यांना संबंधित घटनेची चौकशी करून तात्काळ संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन हल्लेखोरा ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.
चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून एकादी अशी घटना घडली तर एकत्र येऊन निषेध नोंदवून पाठिंबा दर्शवल्यास जरूर न्याय मिळतो हे मात्र खर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *