मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क
पुणे,प्रतिनिधी: शिक्षक पिढी घडवतो आणि घडलेली पिढी समाजाची घडी बसविण्याचे काम करते.
शिक्षण माणसांच्या जीवनात आयुष्यात उजेड बनून येत आणि माणसाचं जीवन उजळून टाकते.म्हणून महत्वाचे असतात ते शिक्षक! जे ज्ञानदानाचे पवित्र काम करतात आणि देशाचं भविष्य घडवितात.अशाच विद्यादानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दर वर्षी महात्मा फुले इतिहास अकादमी,राष्ट्रसेवा समूह,रयत प्रकाशन आणि गिरीप्रेमी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात येतात.यामध्ये आपल्याच सातारा जिल्ह्यातील एक प्रेरणादायी नाव आहे ते म्हणजे प्रा.दिनेश दत्तात्रय मेटकरी.
प्रा. दिनेश मेटकरी हे इंदिरा कन्या प्रशाला व ज्युनियर कॉलेज, मसूर ता. कराड येथे 2007 पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत प्रा. दिनेश मेटकरी यांनी शिक्षण क्षेत्रात आणि गुणवंत विद्यार्थी घडवले.त्यांचे अनेक विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत.तसेच कला, सांस्कृतिक, आणि क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर उज्ज्वल यश संपादन केलेले आहे.
प्रा. दिनेश मेटकरी यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी आधार सामाजिक सेवा संस्थेची स्थापना केली व संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर,कौशल्य विकास शिबीर, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेतल्या. तसेच मुलांचे अक्षर सुधारावे म्हणून आधार सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हस्ताक्षर सुधार प्रकल्प सुद्धा राबविले.
प्रा. दिनेश मेटकरी यांनी कोविड काळात केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे.म्हणून त्यांना पत्रकार संघाचा कोविड योद्धा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आजपर्यंत समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक,कलात्मक आणि सांस्कृतिक कार्याबद्दल दै.लोकमत च्या वतीने 2021 चा आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदय सामंत यांच्या देऊन प्रा. दिनेश मेटकरी यांना गौरविण्यात आले. व महात्मा फुले इतिहास अकादमी, पुणे यांच्या वतीने 2023 चा महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. प्रा. डॉ. तानाजी सावंत साहेब यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले.
एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे.
वर्तमान आणि भविष्याला निर्भयपणे स्वीकारणारे विद्यार्थी पर्यायाने सुजाण नागरिक घडवण्याचे महान कार्य प्रा. दिनेश मेटकरी करीत असलेने त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
