“तुझी माझी जमली जोडी” मालिकेतील कलाकारांची कोल्हापूरात रॅली

  • मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क

कोल्हापूर –सन मराठीवर आजपासून प्रक्षेपित होणाऱ्या तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरात बाईक रॅली काढण्यात आली.या बाईक रॅलीला अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी फ्लॅग दाखविला.त्यानंतर हाॅटेल सयाजी येथून रॅलीस प्रारंभ झाला.यावेळी मालिकेतील मुख्य कलाकार संचित चौधरी व अभिनेत्री अस्मिता देशमुख यांनी सहभाग घेतला.

यावेळी सन मराठीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी माहिती देताना हर्षदा खानविलकर म्हणाल्या, लोकांपर्यंत मालिका पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर नेहमी होत असतो,पण यावेळी कलाकारचं लोकांमध्ये प्रत्यक्षात दाखल होऊन भेटणार असल्याने लोकांना कलाकारांविषयी व मालिकेविषयी अधिक चांगल्या पद्धतीने जाणून घेता येईल.कलाकार व प्रेक्षक यांची प्रत्यक्ष भेट उत्सूकतेची ठरत आहे.याबदद्ल सन मराठीचे कौतुक करावे लागेल.

Advertisements

यावेळी संचित चौधरी व अस्मिता देशमुख यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

मैत्री ही अशी निरागस गोष्ट आहे ना की ती एकदा झाली की ती कशाचा भेदभाव करत नाही. एखाद्या सोबत केलेली मैत्री जर कायमस्वरूपी टिकवली तर त्या व्यक्तीने खूप काही कमावले असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. ‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ ही वाहिनी नेहमीच वेगवेगळ्या विषयात हात घालते, नात्यांचे महत्त्व कथेच्या माध्यमातून पटवून देते आणि आता मैत्री हा विषय घेऊन ही वाहिनी नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेली आहे.

‘मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते’ हे वाक्य पटवून देण्यासाठी ११ डिसेंबरपासून  ‘तुझी माझी जमली जोडी’ ही नवीन मालिका ‘सन मराठी’ वर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *