क्लब 52″ लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात….

“क्लब 52” लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात….

कोल्हापूर : राणा दा’ बनून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण करणारा हार्दिक जोशी लवकरच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता हार्दिक जोशीची अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिका असलेल्या ‘क्लब ५२’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हार्दिक जोशी या चित्रपटात अतिशय हटके भूमिकेत दिसणार आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘क्लब ५२’ या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित वाल्मिक कोळी दिग्दर्शित या चित्रपटात दमदार स्टारकास्ट आणि मनोरंजक कथानक असून, हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

क्लब ५२’ एक डाव नियतीचा… अशी धमाकेदार टॅगलाईन या चित्रपटाला देण्यात आली आहे. या चित्रपटात कसिनो आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं आहे. चित्रपटात अ‍ॅक्शनची भरमार आहे. शिवाय संवादही खटकेबाज आहेत. ‘क्लब ५२’ या चित्रपटात काही नवोदित कलाकारही दिसणार असून, त्यांचा अभिनयही उत्तम झाल्याचे दिसत आहे. चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर यामुळे या चित्रपटानं आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.या आधी हार्दिक जोशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात देखील दिसला होता. आता तो एका नव्या आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांना देखील या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे.

चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. हा धमाकेदार चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना १५ डिसेंबरपर्यंत थांबावं लागणार आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *