आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित, सावित्री श्रीधर विद्यालय पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित, सावित्री श्रीधर विद्यालय ,सदर बाजार कोल्हापूर .सुवर्ण महोत्सवी वर्ष उद्घाटन तसेच वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आज संपन्न झाला .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्रशांत उर्फ उदय पाटील (व्हाईस चेअरमन, गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल ,निपाणी )हे होते. संस्थेच्या कार्याध्यक्ष माननीय पल्लवीताई कोरगावकर मॅडम, सचिव मा.एम .एस .पाटोळे ,भरत लाटकर, प्राजक्ता मुळीक, उपस्थित होते. माननीय संध्या वाणी( प्राथमिक विभाग, सचिव) अध्यक्षस्थानी होत्या .सर्व शिक्षक, माजी मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवानिमित्त पन्नास फुगे आकाशात सोडून उद्घाटन करण्यात आले. यावेळी साने गुरुजींच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी प्रार्थना व नाटिका सादर केल्या. विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संकपाळ सर यांनी केले. श्रीमती नंदुरे मॅडम, येडगे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. सौ. बनकर मॅडम यांनी आभार मानले.सुवर्ण महोत्सवी वर्ष, वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा दिमाखात व आनंदात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *