Media control news network
लोकसभेचे काल दिनांक 16 रोजी निवडणुकीचे बिगुल वाजले सर्व शासन स्तरावर अधिकारी कर्मचारी यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोग यांनी आदेश दिल्या प्रमाणे अनेक ठिकाणी मेन रोडवर व्यवसाय धारक हॉटेल चालक, देशी-विदेशी मध्ये विक्रेते बार, बिअर शॉपी, चायनीज हातगाडी, राजरोज पणे मध्ये रात्रीपर्यंत सुरू असतात असे असताना निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच अनेक अनुसूचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
पोलीस प्रशासन निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे जरुरीच्या आहे. पण तसे होताना दिसत नाही. कोल्हापुरात कावळा नाका परिसर, सीबीएस स्टॅन्ड, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर चौक, दसरा चौक रोड, सोन्या मारुती चौक, व भवानी मंडप मुख्य रोडवर अनेक हॉटेल्स अंडा आमलेटच्या गाड्या मद्यप्राशन करणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी चालू असतात त्यामध्ये वाद विवाद होऊन अनेक ठिकाणी गर्दी करून स्थानिक नागरिकांना नाहक्क त्रास देणे असे अनेक प्रकार रोजच घडत असतात.
अशावेळी पोलीस प्रशासन गस्त घालून संबंधितांच्यावर कारवाई करतील का असे नागरिकांच्यात चर्चा सुरू आहे.