निवडणूक कालावधीत जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:7 Minute, 4 Second

media control news network

कोल्हापूर, दि. 17 : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवार 7 मे 2024 रोजी मतदान व 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून सदरची निवडणूक प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक असल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक उपद्रव टाळण्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 अन्वये कोल्हापूर जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी मनाई आदेश जारी केला आहे.
यामध्ये अधिकारास अनुसरुन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही, निवडणूक कालावधीत लाऊड स्पिकरचा वापर सकाळी 6.00 वाजण्यापूर्वी व रात्री 10.00 वाजल्यानंतर करता येणार नाही, कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय व्यासपिठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही, मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या वेळेपासून ४८ तास अगोदर लाऊड स्पिकरचा वापर करता येणार नाही, कोणत्याही उमेदवारास निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात ठिकाणाचे जवळ किंवा धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्था इ. सार्वजनिक ठिकाणाचे जवळ तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदाना दिवशी मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करणेत आलेल्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रापासून 100 मिटरचे परिसरात कोणाही व्यक्तिला खालील कृत्ये करता येणार नाहीत यामध्ये कोणत्याही स्वरुपात निवडणूक विषयक प्रचार करणे, मतदारांना धमकविणे, मतदारावर ठराविक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव टाकणे, मतदाराचा मतदानाचा हक्क बजावू नये यासाठी कोणत्याही मार्गाने दबाव टाकणे, उमेदवाराचे चिन्ह दर्शविणारे नोटीस बोर्ड प्रदर्शित करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट किंवा तत्सम अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करणे तसेच मतदान केंद्रामध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश करणे,
राज्याची अगर देशाची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा आदर्श आचारसंहिता भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे,चिन्हे रेखाटणे किंवा त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करता येत नाही. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 127 (अ) मधील तरतुदींचा भंग होईल अशाप्रकारे कोणत्याही निवडणूक प्रचाराविषयक साहित्याची छपाई करता येणार नाही. शस्त्र अधिनियम 1959 व शस्त्र नियम 1962 चे तरतुदीखाली विशिष्ट परिस्थितीत संबंधित पोलीस निरीक्षक यांचे पूर्वपरवानगीने(खाजगी सुरक्षा वगळून)नॅशनल बँका, सहकारी बँका, धार्मिक स्थळे, रायफल क्लब व त्यांचे अधिकृत मेंबर, औद्योगिक युनिट, पब्लिक एंटरप्राईजेस यांना अशी हत्यारे व दारुगोळा वाहतुक करता येईल. तथापी सदरचा आदेश कार्यदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकिय कर्मचा-यांना(पोलीस अधिकारी व कर्मचारी) यांना लागू राहणार नाही.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कालावधीत मोटारगाड्या, वाहने ही कोणत्याही परिस्थितीत एकावेळी 10 पेक्षा अधिक वाहनाच्या ताफयात चालविण्यात येवू नयेत. यापेक्षा अधिक परवानगी घेतलेली वाहने ताफ्यात असल्यास 10 वाहनानंतर ताफा खंडीत करणेत यावा व वाहतुकीबाबत सुचनांचे पालन करावे. हा आदेश सर्व मोठ्या संरक्षक गाडयांच्या ताफ्यात तो केंद्र किंवा राज्य शासनाने किंवा कोणत्याही राजकिय व्यक्तिस घेवून जात असेलच आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना झेडप्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असेल तेंव्हा त्यांच्या सुरक्षितते विषयी वापरल्या जाणा-या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.
निवडणूक विषयक प्रचाराच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट १९९५ मधील तरतुदींचा भंग होईल अशाप्रकारचे कोणतेही कृत्य करता येणार नाही. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने ४७ कोल्हापूर व ४८ हातकणंगले या लोकसभा मतदार संघात मतदार म्हणून नोंद नसलेल्या/मतदानाचा हक्क बजाविणेस पात्र नसलेल्या राजकिय पक्षप्रमुख व राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या वेळेपासून ४८ तासाच्या कालावधीत सदर मतदारसंघात वास्तव्य करता येणार नाही. हा आदेश निवडणूक प्रक्रीया 4 जून 2024 पर्यंत कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी लागू राहिल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *