Getting your Trinity Audio player ready...
|
शाहरुखखान अब्दुलबारी गडवाले जिल्हा सरचिट -भा.ज.पा. अल्पसंख्यांक मोर्चा, यांची
विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पत्राद्वारे कळवले आहे. पत्रामध्ये- हे पद समाजातील सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी भरघोस कार्य करणेसाठी देण्यात आलेले आहे.
भारतीय जनता पार्टी या मधील एकूण कारकिर्दीतील आपले बहुमोल योगदान, सामाजिक कार्यासाठी असणारा आपला सकारात्मक दृष्टीकोन आणि सर्वसामान्य जनतेच प्रश्नांची जाण या सर्व बाबी आपणांस उपरोक्त पदासाठी निवड करण्यास पात्र ठरवितात. असे म्हटले आहे
या निवडीराठी भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व मान्यवरांचे सहकार्य लाभले
सदर निवडीसाठी मा. चंद्रकांतदादा पाटील, वस्त्रोद्योग तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, राज्यसभा खासदार मा. धनंजय महाडीक, भा.ज.पा.महा.प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक मा. विजय जाधव, मा. अमल महाडीक माजी आमदार, प्रदेश सदस्य मा. राहुल चिकोडे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाहरुखखान गडवाले यांनी आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यातून
गेली आठ वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांचे प्रश्न सोडविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. हजारो जणांचे प्रश्न सोडविण्यात यश ही आले. आज पर्यंत लॉकडाऊन च्या काळामध्ये व पूर परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जनसेवेच्या भावनेत अनेक लोकांना मदत केले, त्याच बरोबर आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळख पत्र, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना, ईबिसी सवलत, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ ची अल्पसंख्याकांसाठी योजना, गरीब व गरजू लोकांना मोफत व माफक दरात औषधे देणे. अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले आहे
सर्वसामान्यांच्या व जनतेच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहीन शाहरुखखान गडवाले….