जुना राजवाडा पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाकडून धडक कारवाई..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर प्रतिनिधी अजित साळुंखे : राधानगरी तालुक्यातील
कसबा वाळवे येथे कॅनालवर बसवलेले विद्युत पंप चोरणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. २०) संभाजीनगर येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सहा विद्युत पंप आणि चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा पाच लाखांचा मुद्देमालह स्तगत केला.

अनिकेत आप्पासो शिंदे (वय १९), शुभम सुनील चौगले (वय २६, दोघे रा. निगवे खालसा, ता. करवीर) आणि प्रथमेश
शहाजी मांडवकर (वय २२, रा. वाळवे खुर्द, ता. कागल) असे तिघा जनांना अटक करण्यात आले आहे.

कसबा वाळवे येथील कॅनालवरून एकाच रात्रीत सहा विद्युत पंपांची चोरी झाली होती. चोरलेले विद्युत पंप विकण्यासाठी चोरटे कोल्हापूरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांना मिळाली होती.

खबर्या कडून दिनांक 20/03/2024 रोजी येणार आहेत. अशी बातमी मिळाली असता जुना राजवाडा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, संजीव झाडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील संतोष गळवे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार गजानन गुरव, सागर डोंगरे, सतिश बांबरे, अमर पाटील, प्रशांत पांडव, परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, पोलीस नाईक संदीप माने, योगेश गोसावी, गौरव शिंदे, अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन सकाळ पासुन निर्माण चौक व हॉकी स्टेडीयम येथे सापळा लावून थांबले असता

पोलिसांनी संशयास्पद टेम्पो अडवून त्यातील तिघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी मोटार चोरी करून विक्रीसाठी आल्याची सांगितले या वरून त्यांना अटक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *