Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. या अंतर्गत दि.२० एप्रिल २०२० रोजी १२११२ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये ५४०७३ नागरीकांची तपासणी करण्यात आली.
सदरचे सर्व्हेक्षण राजेंद्रनगर, जरगनगर, रामनंद नगर, नारायणी कॉलनी, नेहरुनगर, म्हाडा कॉलनी, शाहुपार्क, सुभाषनगर, जवाहरनगर, विजयनगर, जुना वाशीनाका, तटाकडील तालीम, राजघाट रोड, बुवा चौक, साळोखेनगर, निश्चिती नगर, अंबाई टँक, स्वप्ननगरी, सलाई नगर, सोमनाथ नगर, फुलेवाडी, विचारे माळ, घाटगे कॉलनी, सदर बझार, मुक्त सैनिक वसाहत, कारंडे मळा, बापट कॅम्प, देवकर पानंद, मराठा कॉलनी, पोलिस लाईन, नागाळा पार्क, न्यु शाहुपूरी, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, मातंग वसाहत, शाहुमिल कॉलनी, शाहुनगर, दैालतनगर, यादवनगर, शास्त्रिनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, माकडवाला वसाहत, कावळा नाका, आयोध्यापार्क, बाजारगेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड, न्यु पॅलेस, बाजारगेट, भक्तीपुजा नगर, वारे वसाहत, पद्माळा, मंगेशकर नगर, गजानन महाराज नगर या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. दि.१८ मार्च २०२० पासून एकूण १४४३१९ घराचा सर्व्हे पुर्ण केला असून यामध्ये ६२८५३२ नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.