आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मातृशोक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या पत्नी व सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्री श्रीमती. सावित्री (आक्का ) शामराव पाटील-यड्रावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

गेल्या दीड महिन्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती.  त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या मागे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर अशी दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. राज्यात कोरोना मुळे लॉकडाऊन असल्यामुळे अंत्यविधीसाठी कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये,

Advertisements

असे आवाहान यड्रावकर परिवाराने सोशल मीडियावरून केले होते, त्यामुळे यड्रावकर परिवारातील सदस्य आणि निवडक नातेवाईकांसह उदगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज सकाळी नऊ वाजता श्रीमती सावित्री (आक्का) यड्रावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रांताधिकारी विकास खरात व तहसीलदार डॉक्टर डॉ. अपर्णा मोरे धुमाळ अंत्यविधीसाठी उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालय यांनी प्रसिद्धीस दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *