Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी : लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांना घरामधील अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. अशामध्ये आपल्या नातवाचे बारसे साजरे करण्यासाठी जेष्ठ पत्रकार पंडितराज कर्णिक आणि परिवार यांनी सोशल मिडिया ऑनलाईन पद्धतीचा वापर करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
त्यांनी त्यांच्या नातवासोबत सोशल मिडिया द्वारे फेसबुक लाइव्ह करून हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमामध्ये त्यांनी घरीच असलेल्या पेपरचा वापर करून एक सामाजिक संदेश दिला आहे, ज्यामध्ये “आता जर घरी थांबल तर माझ्या पहिल्या वाढदिवसाला येऊ शकाल ” असे लिहिले आहे.
या कार्यक्रमामध्ये मुलाची आई माधुरी कुंभार व वडील अमोल कुंभार तसेच आजी मंदाकिनी कर्णिक, मावशी मोहिनी कर्णिक, मामा मयूर कर्णिक, अपूर्वा इंदुलकर-कर्णिक उपस्थित होते.
खास म्हणजे अर्णवला पै-पाहुणे व मित्रपरिवार यांच्याकडून ऑनलाइन आशीर्वाद मिळत आहे.
Share Now