मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : सद्या लॉकडाऊनच्या काळात नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) मार्फत नागरिकांना डिजिटल पेमेंटद्वारे सुरक्षित व्यवहार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
‘एनपीआय चलेगा’ या मोहिमेअंतर्गत इंडिया पे सेफ अभियानाकरिता श्रीमती राव यांना निवडण्यात आले असून श्रीमती राव यांच्या वैशिष्टयपूर्ण व्हिडिओच्या मार्फत ६ भागांमधून फोन रिचार्ज,मनी ट्रान्सफर, किराणा आणि मेडिकल स्टोअरची देयक भरणा, कर्मचाऱ्यांचा पगार यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी यूपीआय चा वापर करण्याचे प्रशिक्षण एनपीसीएल देत आहे.याशिवाय भीम यूपीआय अपचा वापर करून नागरिकांना पंतप्रधान केअर फंडामध्ये देणगी द्यावी असे आवाहनही करण्यात येत आहे. सोपी,सुरक्षित, कमी प्रभावी मोबाईल आधारित पेमेंट सिस्टिम डिजिटल पेमेंटचा एक भाग बनला आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी www.UPIchalega. com वर भेट द्यावी.
एनईटीसी फास्टॅग आणि भारत बिल पे एनपीसीआयने ग्राहक व व्यापाऱ्यांना अधिक सुरक्षित आणि व्यापक सेवा देण्यासाठी यूपीआय २.० देखील सुरू केले आहे.
एनपीसीआयने सुरू केलेल्या ‘यूपीआय चलेगा’ मोहिमेअंतर्गत इंडिया पे सेफ अभियान

Read Time:1 Minute, 46 Second