Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:2 Minute, 37 Second
medi control news network
इचलकरंजी : भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, ज्या बुथमध्ये ८२ टक्क्यांपेक्षा जास्त मते धैर्यशील माने यांना मिळवून देण्यात कार्यकर्ते यशस्वी होतील, त्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा गौरव केला जाईल. नरेंद्र मोदी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी केलेली कामे घराघरांत पोहोचवा असे आवाहन हळवणकर यांनी केले
महायुतीच्या कार्यकर्ता मेळावा लायन्स क्लबमध्ये पार पडला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली.
इचलकरंजी शहराला जे पाणी आणतो म्हणत आहेत, त्यांच्या शाहूवाडी गावात मी पाणी मंजूर करून आणले आहे, अशी टीका सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यावर , तर सर्वेवर राजकारण चालत नाही जनताच सर्वेसर्वा असते तीच खासदार ठरवते.’, असा टोला आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर नाव न घेता खासदार धैर्यशील माने यांनी लगावला.
माने म्हणाले, काहींना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचा आहे, असे सांगत आहेत. आम्हालाही मोदी यांनाच पंतप्रधान करायचा आहे. संसदेत मी राबत असल्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणता आला. त्यामुळे मतदारसंघात मी दिसलो नसलेच. काम जो करतो, त्याच्यावर टीका होत असते. ज्या सुळकूडवरून माझ्यावर टीका केली जात आहे, त्यासाठी निधी मी मंजूर करून आणला आहे. पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी अशोक स्वामी, अश्विनी कुबडगे, अमृत भोसले, रवींद्र माने, पुंडलिकराव जाधव, विठ्ठल चोपडे,भाऊसो आवळे, माधुरी चव्हाण, श्रीकांत कांबळे, वैशाली डोंगरे, संतोष भोरे, अनिल डाळ्या, तानाजी पोवार, प्रसाद खोबरे, अलका स्वामी, अशोक पाटील, गजानन जाधवशहाजी भोसले, आदी उपस्थित होते.
Share Now