‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ विषयावर
‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत

‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ विषयावर

‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत

 

            मुंबई, दि. 4 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवारी ६ मे रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी  करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  अमोल  येडगे यांनी माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *