विशेष जिल्हा प्रतिनिधी :कुणाल काटे
कोल्हापूर हुपरी :- हुपरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारक च्या भव्य मैदानावर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मा. श्री. खासदार धैर्यशिल माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविजय निर्धार सभा पार पडली. यावेळी मंत्री महोदयांचे जल्लोषात स्वागत केले.
ही निवडणूक म्हणजे देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. गेल्या साठ वर्षात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी दहा वर्षात झाली आहेत, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले, ते पुढे म्हणाले 1947 नंतर देशानी जी धोरण स्वीकारली, त्यामुळे देशाचे नुकसान झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात देशाला सुखी समृद्धी व आर्थिक दृष्ट्या बलशाली करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. स्मार्ट शहराबरोबर स्मार्ट व्हिलेज ही झालं पाहिजे, गावातल्या युवकाला रोजगार मिळाला पाहिजे, आपल्या देशामध्ये आयात कमी व निर्यात वाढली पाहिजे, देश समृद्ध झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे ही ते म्हणाले. त्याचबरोबर शेती मधून इंधन व वीज निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘नितीन गडकरी हे फक्त बोलत नाही, तर करून दाखवतो’ असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
भविष्य बदलून स्वप्न पूर्ण करण्याकरिता मोदींना पंतप्रधान करूयात व येथून धैर्यशील मानेना निवडून आणूया असे आवाहन केले
आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, माझ्या जुन्या मतदारसंघातील तेरा गावातील 60 % मत हे माझी हक्काची आहेत. आणि ती एक टाक धैर्यशील मानेंना मिळतील. आता धैर्यशील माने ना निवडून आणायची जबाबदारी आमची आहे त्यामुळे रात्रीचा दिवस करून धैर्यशील दादांना निवडून देणार अशी त्यांनी ग्वाही दिली.
त्याचबरोबर याप्रसंगी आमदार विनयराव कोरे सावकार यांनी ‘हुपरीच्या अंबाबाईला स्मरण करून सांगतो की माझ्या मतदारसंघातून इतरांना एकही मताचे लीड मिळणार नाही’ अशी खात्री दिली
माजी कृषिमंत्री खासदार अनिल बोन्डे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, आमदार विनयराव कोरे, आमदार प्रकाश आवाडे, महावीर आण्णा गाट, मनसे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव, शिवसेनेचे नेते मुरलीधर जाधव, हुपरीच्या माजी नगराध्यक्षा जयश्री गाट, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, रजनीताई मगदुम, आर पी आई राज्य सचिव मंगलराव माळगे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, सुरेशदादा पाटील, मनसे जिल्हाप्रमुख गजानन जाधव, जि प सदस्य अरुण इंगवले, जि प सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, जि प सदस्य राहुल आवाडे, जि प सदस्य दलितमित्र अशोकराव माने बापू, जि प सदस्य विजय भोजे, दलित महासंघाचे अध्यक्ष मछिंद्र सकटे, पी आर पी चे जयदीप कवाडे, अण्णासाहेब शेंडूरे, हुपरीचे माजी नगरसेवक सुरज बेडगे, चांदी असोसिएशन चे सुभाषराव ससे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने, भजपा शहरप्रमुख सुभाष कागले, युवा नेते अमित गाट, बाबासाहेब चौगुले, शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार, मनसे तालुकाप्रमुख दौलतराव पाटील, युवा नेते शिवाजी जाधव, शिवसेना हुपरी शहरप्रमुख नितीन गायकवाड, भाजपा रेंदाळ शहराध्यक्ष डॉ. सचिन मेथे, जयकुमार माळगे, रफिक मुल्ला, किरण कांबळे, विजय माळी, शरद पाटील व महायुती चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.