दादा तुम्ही वाळवा व शिराळा तालुक्यातील मतांची चिंता करू नका: सत्यजित देशमुख

विषेश प्रतिनिधी: कुणाल काटे

वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली.
आज पर्यंत कधीच मिळालेला नाही इतका 3 कोटी रुपयांचा विकास निधी धैर्यशील दादा माने यांच्या माध्यमातून या बहादूरवाडी गावाला मिळाला आहे. त्यामुळे आपल्या भागात येणारी विकास गंगा अशीच निरंतर चालू ठेवण्यासाठी धैर्यशील दादांना निवडून देऊया, व मोदींना पंतप्रधान बनवूया असे आवाहन राहुल दादा महाडिक यांनी आपल्या मनोगतून यावेळी केले.

Advertisements


आपले मनोगत व्यक्त करताना सत्यजित भाऊ देशमुख म्हणाले, महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व त्यांची यंत्रणा आहे. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील माने यांनी केलेले विकास काम पाहता त्यांना पुन्हा संसदेत पाठवू. त्यामुळे शिराळा व वाळवा तालुक्याची चिंता करू नका इथे तुमचे शिलेदार तुमच्या पाठीशी आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राहुल दादा महाडिक, सत्यजित भाऊ देशमुख, सम्राट बाबा महाडिक, उपसरपंच भोजराज राजे घोरपडे सरकार , सरपंच अंकुश कुरणे, बाळासाहेब बाबडे, मारुती खोत, तुकाराम खोत, भाऊसो पाटील, हेमंत पाटील, सदाशिव शिंगे, तुकाराम गोरडे, वाय. सी. पाटील, सतीश माने, अनिल गुरव, शंकर वडर, प्रशांत पाटील, महादेव माने, निवास माने, मंगेश पाटील, अभिजीत बाबडे, संपत चव्हाण तसेच येलूर जिल्हा परिषद मतदार संघातील मतदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *