जिथे मी थांबतो, तिथे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतो : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

जिल्हा प्रतिनिधी : कुणाल काटे

रविवार हा लोकसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे इचलकरंजी येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांची प्रचार रॅली व प्रचार समारोप सभा आयोजित करण्यात आली होती. इचलकरंजी येथील शिवतीर्थावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने रॅलीचा पूर्ण मार्ग फुलून गेला होता. घोषणाबाजीने पूर्ण परिसर दानानून गेला. येथील महात्मा गांधी पुतळा येथे रॅलीची सांगता करण्यात आली.


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावरलूम वीज दरामध्ये एक रुपये पर युनिट व आटोलूम साठी 75 पैसे पर युनिट अशी दरात सवलत दिल्याचे जाहीर केले. चार चार दिवस मुख्यमंत्री कोल्हापुरात राहतात या विरोधकांच्या टिके वर बोलताना म्हणाले, अरे जिथे मी थांबतो तिथे मी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतो. ही गर्दी बघून मला धैर्यशील चा विजय निश्चित आहे असं वाटतंय त्यामुळे मी चार जूनला परत गुलाल उधळायला येणार आहे असे मत व्यक्त केले.


यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजपा उपप्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे, मनसे उपप्रदेशाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव, शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे, युवा नेते राहुल आवाडे, मौसमी आवाडे, अमृता मामा भोसले, मोहन मालवणकर, विठ्ठल चोपडे, भाऊसाहेब आवळे, जयेश भुगड, रणजीत जाधव, व महायुतीचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित रॅली संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *