सात मे रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, व मुख्य कार्यकारी अधिकारी हे या ठिकाणी करणार आहेत मतदान..

विशेष प्रतिनिधी: लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत
कोल्हापुरात काही दिवसांपूर्वीच, नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस .व जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची मुख्य पदावर अधिकारीपदी नियुक्तीवर आलेने कोल्हापुरातून प्रथमच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत.


निवडणूक कर्मचारी BLO,योगेंद्र केंबळकर, यांच्या कडून वोटर स्लिप स्वीकारतांना मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कार्तिकेयन एस. तसेच सुपरवायझर एम. एस. पाटील, BLO रोहन शिपुगडे यांच्या कडून वोटर स्लिप स्वीकारतांना जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे, व जिल्हा पोलीस प्रमुख मा. महेंद्र पंडित.
आता पर्यंत 90% वोटर स्लिप वाटप झाले आहे.
गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यातील एकही जिल्ह्यातील नागरिक आपल्या पवित्र मतदानाच्या हक्का पासुन वंचित राहू नये यासाठी कसोशीने प्रयत्न करून प्रबोधनात्मक उपक्रम राबवून हे मुख्य अधिकारी आपले कर्तव्य बजावत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना 100% मतदान करण्याचे आवाहाण केले आहे.

Advertisements

मंगळवार दिनांक 7 मे रोजी सकाळी
दत्ताबाळ शाळा रमण मळा व माजगावकर शाळा बावडा या
बुथ क्रमांक 276/ 29, 276/36 या  मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *