हा जनतेचा विजय : छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर: देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहिर झाला या मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून इंडिया आघडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी 1 लाख 53 हजार 49 मताधिक्याने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा पराभव केला. आणि कोल्हापूर मध्ये आज दिवाळीच असे चित्र दिसून येत आहे.

   उमेदवारी मिळवण्यापासून ते आजच्या निकलापर्यंत अतिशय चुरशीची झालेली ही निवडणुक शेवटी कोल्हापुरच्या जनतेचे जिंकली अशी प्रतिक्रिया शाहु महाराजांनी विजय होताच दिली.निवडणुकीत मतदारांनी मत आणि मान गादीलाच हे सूत्र अंमलात आणत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी विजय साकार केला. या मतदारसंघामध्ये दुरंगी लढत झाली. शाहू छत्रपती यांना ७,४८, ७२५ मते मिळाली. तर मंडलिकांना पाच लाख ९५ हजार ६७६ मते मिळाली. एकूण २३ उमेदवार रिंगणात होते.

Advertisements

   शाहू छत्रपती हे निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढविली. शाहू छत्रपतींनी पहिल्या फेरीत जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. शाहू छत्रपतींना करवीर, राधानगरी, कोल्हापूर उत्तर, चंदगड, कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात आघाडी मिळाली. कागलमध्ये मंडलिकांनी मोठ्या मताधिक्याची अपेक्षा धरली होती. मात्र या ठिकाणीही ते मोठी आघाडी घेऊ शकले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *