कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अटीतटीच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा खासदार धैर्यशील माने यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांचा निसटता 14723 मताधिक्यांनी पराभव केला आणि खासदारकी पटकावली.
यावेळी माध्यमांशी बोलताना अशक्य हि शक्य करतील स्वामी अशी प्रतिक्रीया देत धैर्यशील मानेंनी देवाचे आणि जनतेचे आभार मानले..अत्यंत कसोटी पुर्ण झालेल्या या लढतीत सुरुवातीला आघाडीवर असलेले शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांचे 15 व्या फेरीपर्यंत असलेले मताधिक्य पिछाडीवर पाडत 24 व्या फेरीअखेर 14723 मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा खासदारकीला गवसणी घातली.
Advertisements


पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे एकमेव प्रतिनिधी म्हणून धैर्यशील माने विजयी झाले आहेत.
