लोकसभा निकालावर, खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या धैर्यशील माने यांचेही अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एक दिलाने काम करू, अशी ग्वाही देतो. लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल सर्वश्रेष्ठ असतो. त्यानुसार या निकालाचे पक्ष पातळीवर विश्लेषण केले जाईल. मात्र संपूर्ण देशात केवळ भाजपाला मिळालेल्या जागांच्या संख्येएवढ्या जागा, सबंध इंडिया आघाडीलाही मिळालेल्या नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे देशातील जनतेने भाजपालाच सर्वाधिक पाठबळ दिले आहे, हे स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यानुसार विकसित भारत ही संकल्पना सत्यात आणली जाईल. भाजपचा लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीतील जय पराजयाच्या कारणांचे विश्लेषण करून, त्यातून अधिक जोमाने आणि सकारात्मक विचाराने काम करत राहू.

खासदार धनंजय महाडिक

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *