Share Now
राजू शिंगे / सांगली प्रतिनिधी : मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडीवर असणारे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी १ लाख १ हजार ९४ मतांनी भाजपचे उमेदवारसंजय काका पाटील यांचा एकतर्फी पराभव केला. विशाल पाटील यांना ५ लाख ६९ हजार ६८७ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भाजपचे संजयकाका पाटील यांना ४ लाख ६८ हजार ५९३ मते मिळाली. निवडणुकीतील यशानंतर माध्यमांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले, हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विचाराचा विजय आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेससोबतच राहणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं असल्याने काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.तसेच सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून रॅली काढत आनंदोत्सव साजरा केला.
विशाल पाटील यांनी विजयानंतर म्हटलं की, विश्वजीत कदम माझे नेते आहे. काँग्रेस जो काही निर्णय घेईल तो ते मला कळवतील. त्याप्रमाणे मी वागेल. उमेदवार जरी अपक्ष असला तरी तो महाविकास आघाडीच्या विचारांचा आहे, हे महत्वाचे आहे
Share Now