मुंबई : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती यांनी केली आहे. भाजपानं लोकसभेच्या 28 जागा लढवल्या होत्या. त्यामधील त्यांना फक्त 9 जागा जिंकता आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अपयशाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी केंद्राकडे मला उपमुख्यमंत्री पदावरून मोकळं करावं अशी विनंती केली आहे.आता मला विधानसभेसाठी पूर्णवेळ उतरायचे आहे त्यामुळे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करत आहे की मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी.
मला सरकारमधून मोकळं करावं : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
