रहीम पिंजारी/कोल्हापूर : कोल्हापूर येथील वैभव दिलीप माने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधील कोल्हापूर शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मधील अध्यक्ष व सदस्य पदी नियुक्ती करणे बाबत नावे कळविणेत आली होती. त्याला अनुसरून शासन निर्णया मधील तरतूदीस अधिन राहून कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे,यांनी कोल्हापूर शहर संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर सामाजिक कार्यकर्ते वैभव दिलीप माने यांची अध्यक्ष पदावर नेमणूक करणेबाबत आदेश दिले. यांच्या या निवडीमुळे भागातील नागरिक व हितचिंतक यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सामजिक कार्यकर्ते वैभव दिलीप माने यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड….
