कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : आज माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस ,भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील, संघटनमंत्री मा.विजयजी पुराणिक,अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.हाजी एजाजभाई देशमुख,राज्य हज कमिटी अध्यक्ष मा.हाजी जमालभाई सिद्दीकी यांनी कोविड १९ कोरोना महामारी संदर्भात भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली.
तसेच जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी मार्गदर्शन व सूचना केल्या. कोल्हापूर मधून शाहरुख गडवाले भाजपा अ. यु. मो प्रमुख कोल्हापूर यांनी संवाद साधला.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यात अ.यु. मो. करत असलेल्या कार्याचे कौतुक करून मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच मा.चंद्रकांतदादा पाटील, मा. विजयजी पौराणिक,मा.एजाज देशमुख यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
शहारुख गडवाले यांनी आज बसवेश्वर जयंती व रमजानच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या व घरातच राहूनच “सण साजरा करूया कोरोना विषाणूच्या पादुर्भावातून आपल्या देशाला मुक्त करूया”, असा कोल्हापूर शहरवासीयांना संदेश दिला.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा

Read Time:1 Minute, 56 Second