Share Now
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना व्हायरसच्या या पार्श्वभूमीवर लढाईमध्ये काम करत असणारे डॉक्टर, पोलीस, पत्रकार , सामाजिक स्वयंसेवक यांना सायकल स्नेही ग्रुप व जय गिरनारी ग्रुप यांच्यावतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
या संस्थांच्या मार्फत महापुरामध्ये ही अशीच मदत करून सामाजिक बांधीलकी जपण्यात आली.
या संस्था वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.
या संस्थांच्या वतीने हेमंत पाटील ,भूषण रतू , गौरव खाडिलकर ,अश्विनी कोळी, श्याम सारडा ,रवी दिघे ,हेमचंद्र पाटील, नारायण आपटे ,डॉ. मनोज पाटील, डॉ. रमेश मगदूम ,देवेंद्र खोत ,प्रेम राठोड ,सचिन पाटील, तसेच विवेक खेडेकर ,जगदिष जाजल ,वैभव माईनकर, कल्पेश जाजल ,विजय खिचडे, मनीष ओस्तवाल, तबरेज खान ,तोसिफ पाथरवट ,योगेश शिंदे ,अभिजीत घोरपडे इत्यादी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत.
Share Now