प्रा. निलेश जगताप यांची थायलंड येथे हेणाऱ्या महिला व्हॉलीबॉल स्पर्धेकरीता भारतीय संघाच्या व्यवस्थापक पदी निवड

कोल्हापूर : महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन चे सदस्य, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सह सचिव तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सासवड येथील बापूजी साळोखे ज्यूनियर कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा निलेश जगताप यांची थायलंड येथे दि 13 जुन ते 23 जून या कालावधीत होणाऱ्या 15 व्या 18 वर्षाखालील महिला आशिया चषक व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या व्यवस्थापक पदी निवड झाली आहे.
निलेश जगताप हे राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू असून सासवड येथील राजीव साबळे फाउंडेशनच्या मार्फत सासवड शहरांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी व जोपसण्याकरीता गेली २० वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहेत. राज्य राष्ट्रीय स्पर्धांचे सासवड शहरात आयोजन विविध प्रशिक्षण शिबिर तसेच सेमिनार यांचे आयोजन करतात गोरगरीब व सर्व सामान्य मुलांना खेळाच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालय पोलिस तसेच सैन्य दलात खेळाडू आरक्षणातून स्थिरता प्राप्त करून देण्याकरिता ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत त्या करीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अभ्यासिका भरतीपूर्व मार्गदर्शन केंद्रांची उभारणी त्यांच्या माध्यमातून झाली आहे.
व्हॉलीबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्नाची दखल घेते निलेश जगताप यांची भारतीय महिला संघाच्या व्यवस्थापक पदी निवड करण्यात आली आहे,  त्यांना अलंकनंदा अशोक, रोहित, लवमित कटारिया व ॲडहॉक कमिटी चे सर्व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी विशेष अभिनंदन व शुभेच्छा देते सदिच्छा व्यक्त केल्या.
महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय भाऊ डांगरे सचिव संजय नाईक खजिनदार अरविंद गवईस्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले निवडी बद्दल कोल्हापूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव शिवाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिम खोत रणजीत तोडकर इब्राहिम शेख गौरव खामकर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *