मुंबई : आज NEET UG हेराफेरी प्रकरणात विद्यार्थ्यांचा मोठा विजय झाला आहे. NEET परीक्षेच्या निकालातील अनियमितता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने NTA ला ग्रेस गुण रद्द करून NEET परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
NEET निकालानंतर दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ग्रेस गुण मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्याचबरोबर समुपदेशनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. NEET UG 2024 परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या उमेदवारांची पुनर्परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे एनटीएच्या वतीने सांगण्यात आले. एनटीएने ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएने दोन पर्याय दिले आहेत. हे विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसू शकतात किंवा त्यांच्या जुन्या गुणांसह समुपदेशनासाठी पुढे जाऊ शकतात परंतु त्यांच्या स्कोअरकार्डमधून अतिरिक्त गुण काढून टाकले जातील. ज्या उमेदवारांना आपण पुनर्परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतो असा आत्मविश्वास आहे ते पुनर्परीक्षेला बसण्याचा निर्णय घेऊ शकतात.
१५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार….
