महिला लोकशाही दिन मंगळवारी.

कोल्हापूर : माहे जूनचा महिला लोकशाही दिन मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस.वाईंगडे यांनी दिली आहे.
महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *