पेपर फुटीच्या संशयावरून नीट परीक्षा रद्द….

दिल्ली : गृह मंत्रालयाकडून UGC ला पेपर फुटीची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने UGC NET 2024 ची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान लवकरच परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. तत्पूर्वी केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

Advertisements

UGC NETची परीक्षा देशभरातील विद्यापीठांतील पीएचडी प्रवेश, ज्युनियर रीसर्च फेलोशिप (JRF) आणि साहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाते. 18 जून 2024 रोजी 317 शहरांतील 1 हजार 205 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नक्की काय म्हटले

या घटने बाबत NTAने म्हटले की, “परीक्षा प्रक्रियेची उच्च स्तरावरील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा परीक्षा घेतली जाईल, ज्याची माहिती लवकरच दिली जाईल. तसेच CBI या प्रकरणाची चौकशी करेल. NEET (UG) परीक्षा-2024 शी संबंधित प्रकरणामध्ये ग्रेस मार्कशी संबंधित समस्या पूर्वीच पूर्णतः हाताळली गेली आहे. पाटणा येथे झालेल्या परीक्षेत काही अनियमिततेचा आरोप झाल्याप्रकरणी बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतर सरकार पुढील कारवाई करेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *