Share Now
Read Time:1 Minute, 18 Second
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातून “नाईट राऊंड” काढला. या दरम्यान विनामास्क असणाऱ्या १८ जणांना प्रत्येकी १०० रुपयाचा दंड आज ठोठावला.
महापालिका आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी रात्री १० ते ११:१५ या दरम्यान शहरातील शिवाजी पूल, गंगावेश, रंकाळा परिसरात फेरी काढली. या दरम्यान त्यांनी नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत प्रबोधनही केले. शिवाय विनामास्क मिळून आलेल्या १८ जणांना प्रत्येकी १०० रुपयांचा दंडही ठोठावला. यात घराबाहेर गप्पा मारत बसलेले, शतपावली करत फिरायला बाहेर पडलेले, अशांचा समावेश होता.
अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये. तसेच मास्कचा सक्तीने वापर करावा, असे नम्र आवाहन डॉ.कलशेट्टी यांनी आज पुन्हा केले.
Share Now