अठराव्या लोकसभेचं आज पहिलं अधिवेशन….

दिल्ली : आजपासून म्हणजेच २४ जूनपासून अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु होणार असून, नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी दिल्ली येथे पार पडणार आहे. आज पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह २८० खासदार शपथ घेणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या ३ दिवसात नवनिर्वाचित खासदार आणि मंत्री शपथ घेतील. २७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. नव्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामाची रूपरेषा देखील त्या सादर करतील. २७ जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची ओळख करून देणार असल्याचं समजतं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *