कौतुक नागवेकर / लोणावळा :काल दिनांक ३० जून रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अतिशय दुर्दवी घटना घडली आहे.हडपसर पुणे येथील कुटुंब फिरण्यासाठी भुशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या दुर्गम भागातील धबधब्याकडे गेले होते. पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्या कुटुंबातील एकुण १० जण जोरदार आलेल्या पाण्याचे प्रवाहात वाहुन गेले. त्यापैकी ५ जणांना पाण्याचे बाहेर पडण्यात यश आले पण उर्वरीत ५ जण पाण्याचे प्रवाहात वाहुन गेले असुन त्या पैकी तिघांचे मृतदेह सापडले असुन. तसेच पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेलेल्या दोघांचा शोध सुरु आहे. हि घटना आमच्यासाठी दुःखद असून पुढे पुन्हा अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, लोणावळा, खंडाळा या भागात पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालु नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे या भागात येणाऱ्या पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे अवाहन करण्यात येत आहे. निर्जनस्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालु नये असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन…
