वेश्या व्यवसायास शिवसेनेचा दणका…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अवैध्य धंद्यांना ऊत आला असून, खून दरोडे मारामारी गांजा विक्री वेश्याव्यवसाय राजरोस कोल्हापूर शहरात घडत आहेत. अशा अवैध प्रकारांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. शहरातील प्रमुख वरदळीचा मार्ग असलेल्या स्टेशन रोड व्हिनस कॉर्नर येथे राजरोसपणे वैश्या व्यवसाय सुरु असलेला पाहवयस मिळतो. परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात तोंडाला रुमाल बांधलेला एक इसम थेट घुसला प्रसाद मिळायच्या अगोदर पळ काढला रोजच याचा त्रास परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होतो. असेच यात्री निवास नावाने चालणाऱ्या व्हीनस कॉर्नरच्या चोकात बेधडकपणे वैश्या व्यवसाय चालतो याबाबत शिवसेनेकडे महिलांनी तक्रार केली होती.

आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय  राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने शहरात खुलेआम सुरू असलेल्या वैश्या व्यवसायास चाप बसावा यासाठी अनोखे आंदोलन हाती घेण्यात आले होते.
शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी वैश्या व्यवसाय करणाऱ्याना हाकलून पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. शिवसेनेचे या दणक्याने सदर भागातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *