पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी दुपारी 1.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व विशाळगडाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता विशाळगड (गजापूर) येथे आगमन व भेट. दुपारी 4 वाजता विशाळगड (गजापूर) येथून कोल्हापूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर येथे राखीव, सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल) सकाळी 10.30 वाजता अवधुत महिला सहकारी दूध डेअरी, गडहिंग्लज उद्घाटन सोहळा. (स्थळ : वडरगे रोड, विद्यानगर शेजारी, गडहिंग्लज) सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कोल्हापूर वतीने गडहिंग्लज येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा. (स्थळ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज) सकाळी 11.30 वाजता दुय्यम निबंधक कार्यालय रजिस्टर ऑफीस या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळा. (स्थळ : तहसिलदार कार्यालय, गडहिंग्लज) दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटना जि. कोल्हापूर वतीने डॉक्टर डे कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : सुप्रीम महाराजा बँक्वेट, मार्केट यार्ड, कोल्हापूर) कोल्हापूर येथे राखीव, सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल) सकाळी 11 वाजता गडहिंग्लज नगरपालिकेच्यावतीने घंटा गाडी, रेक्यू वाहन व ट्रॅक्टर पूजन कार्यक्रम. (स्थळ : गडहिंग्लज नगरपरिषद, गडहिंग्लज), सकाळी 11.30 वाजता गिजवणे ता.गडहिंग्लज येथे इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रम. (स्थळ : गिजवणे, ता. गडहिंग्लज), दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता सिध्दनेर्ली ता. कागल येथे इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रम. (स्थळ : सिद्धनेर्ली, ता. कागल), सायंकाळी 6 वाजता भडगाव ता. कागल येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व इमारत बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रम. (स्थळ : भडगाव, ता. कागल ) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल) सकाळी 11.30 वाजता कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ, गोकुळ, कोल्हापूर येथील गोकुळ हर्बल पशुपुरक प्रकल्प उद्घाटन सोहळा. (स्थळ : महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, गडमुडशिंगी ता. करवीर), दुपारी 1.30 ते 4.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 4.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडापार्क येथे विविध विकास कामाची जागा पाहणी. (स्थळ : राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडापार्क) सायंकाळी 5.30 वाजता छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथील 7 मॉडयूलर ओटी/शस्त्रक्रियागृह, नॅट मशिन, कान, नाक, घसा विभागाचे नुतनीकरण व नर्सेस हॉस्टेलचे नुतनीकरण कार्यक्रम.(स्थळ : छत्रपती सर्वोपचार कोल्हापूर प्रमिलाराजे रुग्णालय), सायंकाळी 7 वाजता राखीव (स्थळ : शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर ) रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *