कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने या आपत्ती काळात गरजू लोकांपर्यंत मदत पोचवण्याचे कार्य सुरु आहे.
कार्यकर्त्यांच्या मार्फत हजारो लोकांना फूड पॅकेटच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये मास्क व सॅनीटायझरचे वितरण तसेच काही प्रभागात स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजुंना अन्न धान्य वितरीत केले जात आहे.
याच धर्तीवर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या ५–६ दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये एका डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
स्थानिक वॉर्ड मधील एखादी व्यक्ती किरकोळ आजारी (सर्दी, ताप, खोकला, व्हा.इन्स्पेक्शन)इत्यादी असल्यास त्याची संपूर्ण आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ती औषधे, इंजेक्शन इत्यादी सेवा मोफत स्वरूपात देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्यावतीने इयत्ता १२ वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या फक्त मुलींसाठी पुढील नमूद केलेल्या सुविधेपैकी आवश्यकतेनुसार एक लाभ एका विद्यार्थिनीला देण्याचा मानस आहे. यामध्ये १) विद्यार्थिनीस ड्रेस २) मोफत एस.टी अथवा के.एम.टी पास ३) कोर्स फी ४) वह्या-पुस्तके संच याचा समावेश असणार आहे.
तरी असे निवेदन पत्रकाच्या माध्यमातून देऊन भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्यावतीने आवाहन करण्यात येते कि, कोल्हापूर शहरातील नागरीकांनी वरील सेवेचा लाभ घेण्यासाठी ज्या-त्या वॉर्ड मधील स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून वरील सेवेचा लाभ घ्यावा