सेंट झेव्हिअर्सच्या माजी विद्यार्थ्यांकडून अडीच लाखाचे साहित्य ग्राम विकासमंत्र्यांकडे सुपूर्द

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 7 Second

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सीपीआर तसेच महापालिका रुग्णालयास सुमारे अडीच लाखाचे कोरोना प्रतिबंधक साहित्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज सुपूर्द केले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, युवराज पाटील आदि सर्वजण उपस्थित होते.
सेंट झेव्हिअर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोना विरुध्दच्या लढ्यातील आरोग्य योध्यांसाठी मोलाची मदत केली असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
कोरोना विरूध्दच्या लढाईत आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे अडीच लाखाचे कोरोना प्रतिबंधक साहित्य देण्यात आले, यामध्ये सीपीआर हॉस्पिटलच्या कोरोना विभागास ५ बेड सेट, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल व पंचगंगा हॉस्पिटल येथील वैद्यकीय स्टाफकरिता ३०० फेस शिल्डचा समावेश आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी  ५ हजार फेस मास्क, ४०० फेस शिल्ड व २ हजार हॅण्ड ग्लोव्हज, शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलीस बांधवांसाठी १०० फेस शिल्ड, १ हजार फेस मास्क व गरजू व्यक्तिंना १०० अन्नधान्याची पाकिटे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
यासाठी झेव्हिअर्सच्या १९९९ च्या बॅचच्या व्हीक्टर बोरजीस, महेंद्र चव्हाण, तेहजीज नदाफ, शतानिक राजेभोसले, देवेंद्र जाधव, संग्राम घराळ यांचे सहकार्य लाभले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *