Share Now
विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोनाच्या जागतिक महामारीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व संबंधित घटकांचा गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील सतेज पाटील ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ग्रामीण संपर्कप्रमुख बजरंग रणदिवे यांच्या हस्ते फेटा व रोप देऊन या सर्वांना गौरविण्यात आले.
डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत स्वच्छता व दक्षता समिती कर्मचारी, ‘आशा’ व महिला बचत गट, पोलीस कर्मचारी, महसूल, वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कोरोना विरुद्धच्या लढ्यात जे योगदान दिले ते कौतुकास्पद असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अशोक पाटील, माजी सभापती प्रदीप झांबरे, जि .प .चे माजी सदस्य बाबासाहेब माळी, आप्पासाहेब धनवडे, सचिन पाटील, रावसाहेब पाटील, विनोद सोनुले, सौ. माधुरी कांबळे, जितेंद्र कांबळे, सुभाष सोनुले, राहुल सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी आर.एन. गाढवे, डॉ. रोजाना मुल्लानी, संतोष कांबळे, दिलीप थोरात आदि उपस्थित होते.
Share Now