खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वप्निलचे अभिनंदन

कोल्हापूर: नेमबाजी क्रीडा प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या सुपुत्राने, ऑलिंपिक मध्ये कांस्यपदकाची कमाई केली. केवळ कोल्हापूरला नव्हे तर संपूर्ण देशाला स्वप्निल बद्दल अभिमान आहे. अशी प्रतिक्रीया खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.यावेळी अभिनंदनन करताना ते म्हणाले स्वप्निलच्या या उत्तुंग यशामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन आणि चालना देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळेच भारताचे खेळाडू विविध क्रीडा प्रकारात उतुंग कामगिरी करत आहेत. कोल्हापूरची शान असलेल्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. या खेळाडूला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *