भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

मिरज /इर्शाद शेख: भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबदिन शेख यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार आज तरुणांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे त्यांनी केलेल्या समाजकार्याचा तरुणांनी अनुकरण करून समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा अण्णाभाऊ हे दीनदुबळ्याचे, गिरणी कामगारांचे,शोषितांचे,शेतकरी व शेतमजूर महिलांचे वेदना आपल्या शाहिरीतून व्यक्त करून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ साठेनी केले. अण्णाभाऊ साठेनी केलेल्या महान कार्याचे दखल घेऊन भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा असे जयंती वेळी पुष्पहार अर्पण करताना शेख म्हणाले

यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख, अण्णाभाऊ जयंती समितीचे भिमराव बेंगलोरे,बबन साठे, शंकर कांबळे,भीम आर्मी जिल्हा युवक संघटक साद गवंडी,मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारूक,हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख, शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष विजय बल्लारी व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहम्मदहनिफ मुजावर सहित कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *