अण्णाभाऊंनी बहुजन समाजाच्या जागृतीसाठी आयुष्य वेचले : शिवश्री बाळासाहेब पाटील

कोल्हापूर /अजय शिंगे – साळोखे नगर येथील विद्यावर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित विद्यामंदिर शाहूपुरी( कोपार्डेकर शाळा) या शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब पाटील हे होते अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील होते राधानगरी पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी वसंतराव गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते
यावेळी बोलताना शिवश्री बाळासाहेब पाटील म्हणाले अण्णाभाऊंनी आपल्या कथा कादंबऱ्यातून बहुजन समाजाची दुःखे मांडली तसेच बहुजन समाजाला व्यवस्था परिवर्तनाचा संदेश दिला
या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक एस वाय पाटील एम बी डावरे सौ स्नेहा चव्हाण सारिका पाटील श्रुणिका चौगुले तसेच शाळेचे माजी विद्यार्थी कु राजनंदिनी व राजवर्धन यांच्यासह शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जीवनावर व कार्यावर आधारित पोवाडे व लावण्या सादर केल्या
स्वागत व प्रास्ताविक अजित व्हनाळकर सूत्रसंचालन युवराज गायकवाड यांनी तर आभार स्नेहा चव्हाण यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *