जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत अनन्या पाटीलला दोन सुवर्ण पदके…

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजश्री छत्रपती शाहू कॉलेजची विद्यार्थिनी अनन्या तानाजी पाटील हिने नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत दोन सुवर्ण पदके पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठीचा आपला प्रवेश निश्चित केला आहे
जिल्हा योगासन क्रीडा संघटनेच्या वतीने दिनांक २८ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणी योगासन स्पर्धेत अनन्याने शानदार कामगिरी करताना दोन पदकांची कमाई केली. अनन्या ने मुलींच्या ज्युनिअर कलात्मक एकेरी गटात व ज्युनिअर कलात्मक दुहेरी गटात सुवर्ण पदके पटकावली. आता ती दिनांक १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान संगमनेर (जिल्हा-अहमदनगर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
तिच्या या यशाचे रयत शिक्षण संस्था साताराच्या जनरल बाॅडी सदस्या  सरोज पाटील (माई), महाविद्यालय विकास समितीच्या प्रमुख सौ.संगीता पाटील, सदस्य प्रशांत पाटील आणि आजीव सदस्य गायकवाड डी.एम यांनी कौतुक केले आहे. या यशात तिला राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.एल. डी. कदम व उपप्राचार्य चव्हाण एल. बी यांचे प्रोत्साहन तर वर्गशिक्षिका  पाटील स्नेहा एस. आणि क्रीडा संचालक राणेसंकपाळ आर. एस. यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *